मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

संघाच्या शिकवणुकीमुळेच सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय

अहमदाबाद- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइकसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकलो, असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.
 
सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या भारतीय सैन्याच्या निर्णयामागे ठामपणे उभे राहणारे पंतप्रधान महात्मा गांधींच्या भूमीतून आलेले आणि गोव्यातून आलेले संरक्षणमंत्री हे सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे समीकरण आहे. मला अनेकदा 
 
याचे आश्चर्य वाटते. मात्र, संघाची शिकवण हा आमच्या विचारसरणीचा मुख्य गाभा असल्यामुळे हे शक्य झाले, असे पर्रिकर  यांनी म्हटले.
 
उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला झाल्यानंतर लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले होते. त्यामुळे पंतप्रधान आणि मला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. उरी हल्ल्यात 19 जवान शहीद 
 
झाल्यानंतर 29 सप्टेंबरपर्यंत सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवर पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात येत होते. मलाही बर्‍याच टीकेला सामोरे जावे लागले, असे यावेळी पर्रिकर यांनी सांगितले. यावेळी पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या पुराव्यांवरून रंगलेल्या राजकारणावरही भाष्य केले.