Widgets Magazine
Widgets Magazine

दुजाने आत्मसमर्पणास नकार दिला होता

गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (17:17 IST)

दोन दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अबु दुजानाचा खात्मा झाला. चकमकीत ठार होण्यापूर्वी दुजानाने आत्मसमर्पणास नकार दिला होता. ‘मी गिलगिट-बाल्टिस्तान येथे राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांना जिहादसाठी सोडून जात आहे,’ असे त्याने लष्कराच्या अधिकाऱ्यांना म्हटले होते. हा भाग पाकिस्तानातील खैबरपख्तूनवा प्रांतात येतो. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने काश्मिरी नागरिकाच्या माध्यमातून दुजानाबरोबर फोनवर चर्चा करत त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला होता. या वृत्तानुसार दुजानाबरोबर काश्मिरी नागरिकाने सुरूवातीला काही वेळ स्वत: चर्चा केली त्यानंतर त्याने फोन लष्कराच्या अधिकाऱ्याला बोलण्यासाठी दिला.

दुजानाने लष्करी अधिकाऱ्याला म्हटले, ‘कसे आहात ? मी काय म्हणतोय, कसे आहात?.’ यावर ते अधिकारी म्हणाले, ‘आमचं सोड. तू शरण का येत नाहीस? तू या मुलीशी लग्न केलं आहेस. तू जे काही करतोस ते योग्य नाही.’ या वृत्तानुसार अधिकाऱ्याने दुजानाला समजावण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान युवकांचा वापर करत काश्मीरमध्ये हिंसा करत आहे, असे सांगितले. पण दुजानाने हे नाकारले व आत्मसमर्पण करणार नसल्याचे म्हटले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राधेश्याम मोपलवार पदच्युत

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम ...

news

चीनकडून मसूद अजहरसाठी व्हेटो अधिकार वापर

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यावर ...

news

दुर्घटनाग्रस्त भारतीय विमानातील 50 वर्षांनंतर मिळाले अवशेष

डॅनियल रोश याला बासोन ग्लेशियरवर मानवी देहाचे काही अवशेष मिळाले आहेत. भारतीय विमानातील ...

news

भ्रष्टाचार झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा सभात्याग, लोकशाहीच्या इतिहासातील पहिलीच घटना - धनंजय मुंडे

विधान परिषदेचे सदस्य किरण पावसकर यांनी देवीपाडा, बोरीवली येथील एसआरए प्रकल्पातील ...

Widgets Magazine