Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस शेतकरी वर्गाला समर्पित

शनिवार, 10 जून 2017 (11:47 IST)

rashatrawadi congress

१० जून रोजी असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा १८ वा वर्धापनदिन हा बळीराजाला समर्पित करण्यात आला आहे. यानिमित्ताने बळीराजाची सनद शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ही सनद समाजमाध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात येत आहे या बाबत सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे, तटकरे यांनी सांगितले आही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन आहे. आम्ही हा वर्धापनदिन राज्यातील बळीराजा समर्पित करतो. या वर्धापनदिनाला आम्ही बळीराजाची सनद राज्य शासनाकडे देणार आहोत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी, स्वामिनाथन कमिटीची शिफारस लागू करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत देणे अशा विविध मागण्या या सनदेद्वारे करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपापल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या माध्यमातून ही सनद राज्य सरकारला देतील. सनदीमधील सर्व बाबी सरकारने पूर्ण करव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल पण बळीराजासाठी संघर्ष सुरूच राहणार.

 
११ तारखेपासून विधिमंडळ पक्षनेते अजित पवार व मी मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला जाईल. संपूर्ण राज्याचा दौरा ४ टप्प्यांत पूर्ण केला जाईल. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्याचा आमचा उद्देश आहे. याद्वारे विविध सेलची बैठक घेतली जाईल, पक्षात जे बदल करणे गरजेचे आहेत ते बदल केले जातील.
 
कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला की सरकार म्हणतं योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ, यांना निर्णय घ्यायचाच असेल तर मग विलंब का करतात? शेतकरी सरकारच्या नावे आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्यांचा किती रोष आहे हे यातून स्पष्ट होते. सरसकट कर्जमाफी व्हायला हवी ही राष्ट्रवादीची मागणी आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना गुंड असे संबोधित केल्याबद्दल आमचा आक्षेप आहे. हे सरकार किती शेतकरीद्रोही आहे हे यातून स्पष्ट होते. यापुढे तरी त्यांनी असे वक्तव्य करू नये. १३ जून रोजी शेतकरी रेल रोको आंदोलन करणार आहेत त्यात आमचे कार्यकर्ते शेतकरी आहेत म्हणून सहभाग घेतील.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुंबईत पाऊसाला जोरदार सुरुवात

कोकणात मान्सून आल्या नंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं ...

news

Shiv Sena : उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त माहिती शिवसेनेला नाही ,नवीन वाद

राज्यात होत असलेल्या शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या ...

news

Crime : चिडलेल्या प्रेयसीने अॅसिड फेकले जाळले प्रियकराला

मुलींवर नेहमी काही कारणांनी मातेफिरू अॅसिड फेकतात अश्याच घटना समोर आल्या आहेत, मात्र ...

news

गांधी चतुर बनिया, अमित शहा यांनी फोडले नवीन वादाला तोंड

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षावर मोठी टीका केली आहे, मात्र यावेळी ...

Widgets Magazine