Widgets Magazine

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या मंजूर नाही : पंतप्रधान

Last Modified गुरूवार, 29 जून 2017 (16:48 IST)

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना दिला आहे.

साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं. 'गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते', असं मोदी बोलले आहेत. आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. महात्मा गांधींच्या देशात आहोत, याचा का म्हणून विसर पडतो ? अशी खंतही मोदींनी यावेळी व्यक्त केली.
झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांचं हे वक्तव्य आलं आहे.यावर अधिक वाचा :