गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (14:22 IST)

वास्तव जेलच्या नोकरीसाठी अनेक उच्च शिक्षित विद्यार्थी

सध्या नोकरी तीही पूर्ण आयुष्य बहर पुरेल अशी खात्री नाही तर खाजगी नोकर्या या तर कधीच टिकत नाही त्यामुळे अनेक उच्च शिक्षित विद्यार्थी जी मिळेल ती नोकरी मिळवत आहेत. अशेच घडले आपल्या राजधानीत देशातील तिहार तुरुंगात उच्चाशिक्षित पदवीधर तरुणांना आज तुरंगरक्षक, वॉडर्स सारख्या पदांवर नोकरी करावी लागत आहे. देशातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या तिहार तुरुंगात यावर्षी ५९ तरुण-तरुणी नोकरीसाठी रुजू झाले आहेत. 
 
पाच इंजिनिअर, चार एमबीए तर अन्य विज्ञान, वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत. तुरुंगरक्षक, वॉडर्स ही छोटी पदे असून त्यासाठी १२ वी उर्तीण एवढीच शैक्षणिक पात्रता लागते. तिहार तुरुंगातील ही नोकरभरती सध्याचे वास्तव चित्र दाखवणारी आहे. त्यामुळे निकारी मिळणे किती कठीण आहे हे आपल्याला समोर दिसून येत आहे.