गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (11:17 IST)

अमित शहा यांनीत त्यांचे पारशी आडनाव बदलावे : ओवेसी

अमित शहा यांचे शहाहे आडनाव पारशी आहे. मग शहरे आणि गावांची नावे बदलणार्‍या भाजपने आता अतिम शहा यांचेही नाव बदलावे. शहा हे पारशी आडनाव किती दिवस बाळगणार? त्यांनी त्यांचे आडनाव बदलावे असा खोचक आणि तिखट सल्ला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. 
 
प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी शहा यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता ओवेसी यांनीही भाजप आणि शहा यांना शहा हे आडनाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.
 
उत्तर प्रदेशात शहरांची नावे बदलण्याची पद्धतच सुरु झाली आहे. आग्राचे नाव बदलले, अलाहाबादचे नाव बदलले, फैजाबादचे नाव बदलले. मग शहा हे त्यांच्या नावातून शहा कधी हटवणार? शहा हा पारशी शब्द आहे. मूळ इराणी वंशाचे असलेल्या पारशींमध्ये शाह म्हणण्याची प्रथा आहे. शहा यांचे आडनाव गुजराती तर मुळीच नाही असे सांगत इतिहासकार इरफान हबीब यांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. गुजरातारा असे म्हटले जायचे त्यावरून गुजरात हे नाव पडले आहे. तेदेखील बदलले पाहिजे असे त्यांनी म्हटले होते.