testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रामाप्रमाणेच तिहेरी तलाक आस्थेचा मुद्दा

काँग्रेस नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील यांनी भगवान राम आणि तिहेरी तलाकची तुलना करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. हा भगवान रामाप्रमाणेच आस्थेचा मुद्दा असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला.
भगवान राम यांचा अयोध्येत जन्म झाल्याची जशी हिंदूंची आस्था आहे, तशीच आस्था मुस्लिमांची तिहेरी तलाकबद्दल आहे. रामावरील हिंदूंच्या आस्थेवर शंका घेता येत नाही, तर मग तिहेरी तलाकवर सवाल का?’ तसेच तीन तलाक अमान्य झाल्यास नवीन कायदा करण्याच्या केंद्र सरकारच्या वक्तव्यावरूनही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले.

मुस्लिम धर्मात 1400 वर्षापासून तिहेरी तलाकचे पालन होत आहे आणि हा विश्वासाचा मुद्दा आहे. यामुळे तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे असे कसे म्हणता येईल? जर भगवान राम यांचा जन्म अयोध्येत झाला होता ही हिंदूंची आस्था घटनेला मान्य आहे, तर मग तिहेरी तलाकची मुस्लिमांची आस्थाही मान्यच केली पाहिजे, असे सिब्बल म्हणाले. निकाह आणि तलाक हे एकमेकांशी जुळलेले आहेत, तर दुसर्यांना हे खुपण्याचे कारण काय?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला.


यावर अधिक वाचा :