Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

राहुल गांधीची उपहासात्मक टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या एका ट्विटनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे. ‘घाई करा करा मोदीजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना
पुन्हा एकदा तुमची गळाभेट हवीये’ असा खोचक टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या ट्विट करून लगावला आहे.

दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा अमेरिकेकडून कायम निषेध होतो आहे.पण रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘पाकिस्तान आणि तिथल्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांना आम्ही सुरूवात केली आहे. अनेक आघाड्यांवर ते सहकार्य करत आहेत यासाठी त्यांचे आभार’ असं ट्विट केलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका केली आहे.


यावर अधिक वाचा :