testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

uddhav and narendra modi
Last Modified बुधवार, 12 जुलै 2017 (12:15 IST)

अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गर्जनेनंतर अतिरेक्यांनी शेपूट घातले ते घातलेच व अमरनाथ यात्रा पुढची २०–२१ वर्षे सुरळीत पार पडली. आता पुन्हा अतिरेकी मोकाट सुटले आहेत. मोदीजी, त्यांना आवरा हो! असं आवाहनच उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडेतोड टीका केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी अतिरेक्यांवर कारवाई करण्याच मागणी करत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.यावर अधिक वाचा :