शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 मे 2017 (11:57 IST)

सुषमा मॅमनं माझी सर्वाधिक मदत केली : उज्मा

पाकिस्तानात ‘अडकलेली’ उज्मा भारतात परतल्यानंतर तिने पाकिस्तानमधील अनुभव जगासमोर मांडला आहे. उज्मानं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

उज्मा म्हणाली , ‘भारतीय दूतावासानं माझ्यावर जो विश्वास दाखवला तीच गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे. मी तेथील अधिकारी वर्गाला माझं म्हणणं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला संपूर्ण मदतीचं आश्वासनं दिलं. त्यावेळी सुषमा मॅमनंही सांगितलं की, ‘काहीही झालं तरी आम्ही तुला ताहीरकडे सोपावणार नाही. त्याचे हे शब्द ऐकून मला फार धीर आला.’ पाकिस्तान ‘मौत का कुआं’ आहे. तिथं जाणं सोपं आहे पण परत येणं कठीण. मी सगळ्यांना सल्ला देते की, पाकिस्तानात कधीही जाऊ नका. आपला भारत देश खूप सुंदर आहे. आपल्याकडे सुषमा मॅमसारख्या परराष्ट्र मंत्री आहेत. मी आतापर्यंत दोन ते तीन देश फिरले आहेत. पण मला गर्व आहे की, मी भारतीय असल्याचा. सुषमा मॅमप्रमाणेच मी पंतप्रधान मोदींचेही आभार मानते.’