शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2016 (11:38 IST)

UP: सुनेची सासूला बेदम मारहाण व्हिडिओ वायरल

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एका सुनेने आपल्या सासूची बेदम मारहाण केली आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सुनेचा क्रूरपणा कॅमर्‍यात कैद झाला आणि व्हिडिओमुळे तिची पोल उघडली.  
 
सासूचा जीव घेण्याचा प्रयत्न   

या व्हिडिओत सुनेने आधी आपल्या 70 वर्षाच्या सासूला लाथा मारल्या आणि बर्‍याच वेळा डोक्यावर पत्थर देखील मारले. असे केल्यानंतर देखील तिचा राग शांत झाला नाही तर तिने सासूच्या गळ्यावर कपडा बांधून तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला.  
 
पतीशी जुने भांडण   
प्रकरण 4 जानेवारीचे आहे जेव्हा ही महिला बाजारात जाण्यासाठी घरातून निघाली आणि पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या नवर्‍याविरुद्ध  तक्रार नोंदवली. पोलिसांनी देखील महिलेच्या तक्रारीवर नवर्‍या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तिला घरी पाठवून दिले. घरी आल्यावर महिलेने आपला राग सासूची मारहाण करून व्यक्त केला.    
 
सासूला करंटं देण्याचा प्रयत्न   
सुनेच्या क्रूरपणेचा हा व्हिडिओ कुंदन श्रीवास्तव नावाच्या या व्यक्तीने फेसबुकवर अपलोड करून दिला आणि त्यानंतर हा व्हिडिओ वायरल झाला. कुंदनचा दावा आहे की सुनेने आपल्या सासूला गरम पाणी करण्याच्या रॉडने करंटं देण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यांनी सांगितले की या महिलेने आधीपण आपल्या सासूचा जीवघेण्याचा प्रयत्न केला आहे.  
 
महिलेशी विचारपूस करत आहे पोलिस  
महिलेच्या पतीला आपल्या बायकोच्या वागणुकीबद्दल माहीत होते म्हणून त्याने घरात सीसीटीवी कॅमेरा लावला होता. सीसीटीवी फुटेज समोर आल्यानंतर आरोपी महिलेला पोलिस ठाण्यात घेऊन गेली आहे. महिलेशी विचारपूस सुरू आहे.