Widgets Magazine
Widgets Magazine

वेंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती

नवी दिल्ली- राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता वेंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपति पदाची शपथ दिलवली. पंतप्रधान मोदी यांनी वेंकय्या नायडू यांना शुभेच्छा दिल्या. या समारंभात माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनके नेते सामील झाले.

आंध्र प्रदेशमधून उपराष्‍ट्रपती झालेले नायडू हे तिसरे उपराष्‍ट्रपती आहेत. नायडू यांच्यापूर्वी डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन आणि व्ही. व्ही. गिरी हे आंध्र प्रदेशमधून उपराष्‍ट्रपती बनले होते. नायडू सलग दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. जुलै २००२ ते ऑक्‍टोंबर २००४ पर्यंत त्‍यांनी भाजपचे अध्यक्षपद सांभाळले होते. २००४ ला लोकसभा निवडणूकीत भाजपचा पराभव झाल्‍यानंतर नायडू यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नायडू यांनी ग्राम विकास मंत्री पद सांभाळले होते. 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखालील सरकारमध्ये  ते नगरविकास खात्‍याचे मंत्री होते. त्‍यानंतर त्‍यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचाही कार्यभार सोपविण्यात आला होता. 

 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

“अँबी व्हॅली’ चा लिलाव होणारच; सुब्रतो रॉय यांना झटका

पुण्याजवळ असलेल्या अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यात यावा म्हणून सहारा समुहाने सर्वोच्च ...

news

पाकिस्तानी हवाई दलाचे जेट कोसळून पायलट ठार

पाकिस्तानी हवाई दलाचे एक जेट विमान कोसळून पायलट ठार झाल्याची माहिती एका निवेदनाद्वारे ...

news

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात आणि ...

news

‘बाटू’च्या इंडक्शन प्रोग्रामचे यजमानपद कुलगुरू डॉ. विलास यांची उपस्थिती

नाशिकच्या आयडीया कॉलेजला ‘बाटू’ विद्यापीठाच्या इंडक्शन प्रोग्रामचे यजमानपद मिळाले आहे. ...

Widgets Magazine