Widgets Magazine

Uddhav Thakare : लाल दिव्याचा निर्णय लोकप्रियतेसाठी का ?

Last Updated: शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (15:31 IST)
नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाला आणि लोकांना नेमका काय फायदा झाला ते कळायला मार्ग नाही. त्याचप्रमाणे लाल दिवा मोडीत काढल्याने देशातील व्हीआयपी संस्कृती खरोखरच नष्ट होणार आहे काय की सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला हा निर्णय आहे? असा प्रश्न उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
मोदी सरकारच्या लाल दिवे हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे. सोबतच
जेथे भाजपचे राज्य नाही अशा ठिकाणचे मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लाल दिवा वापरायचाच असा निर्णय घेतला तर तुम्ही काय करणार? असा प्रश्नही अग्रलेखात विचारला आहे.


यावर अधिक वाचा :