testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेनेच्या जवानाचा व्हिडिओ वायरल, 'भुंकणार्‍या कुत्र्यांना धडा शिकवण्यासाठी पुढे या जवानांनो'

news
Last Modified मंगळवार, 14 मार्च 2017 (14:09 IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानाने राजकारणी आणि भ्रष्ट शासकीय अधिका-यांना आपल्यापासून दूर राहण्याचा फलक गावात उभारला आहे, तसेच यासंदर्भात एक व्हिडिओही प्रसिध्द केला आहे. भारतीय सैन्यातील तेजबहाद्दूर सिंह याच्या पाठोपाठ आता या जवानानेही सरकारविरोधात उघड भूमिका घेतली आहे.

जर मी देशाचं रक्षण करत असताना शहीद झालो, तर नितीमत्ता, भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाºयांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये, ही माझी अंतिम इच्छा आहे, असे या जवानाने म्हटलेले आहे.

चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे या गावचे जवान लान्स नायक रणजीत गावडे यांनी गावात हा भव्य फलक लावलेला आहे. दिवसेंदिवस भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द वापरले जा असल्याने गावडे यांनी हा फलक लावलेला आहे. त्यांनी उभारलेल्या या फलकात म्हटले आहे, की मी सैनिकी सेवा बजावत असताना मला वीरमरण आल्यास नितीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाºयांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये. ही माझी शेवटची इच्छा असेल, सन्मानाने जगण्यासाठी आणि या भुंकणाºया कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळ्यांनो संघटित व्हा, स्वाभिमानी सैनिक, लान्स हवालदार रणजित गावडे, म्हाळुंगे ता. चंदगड असा मजकूर या फलकावर लिहिलेला आहे.


यावर अधिक वाचा :