शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

#webviral शिखाने फेटा काढून वाचवला कुत्र्याचा जीव (व्हिडिओ)

कोणी संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी लगेच निर्णय घ्यावा लागतो. अशावेळी आपल्या परंपरेशी तडजोड करावी लागली तरी निर्णय हा आपला असतो.
 
एका शीख व्यक्तीने आपली धार्मिक परंपरेशी तडजोड करत आपली पगडी काढून पाण्यात बुडत असलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला. त्याची ही कृती व्हायरल झाली आणि आपल्या देशातच नव्हे तर दुनियेत त्याची स्तुती होत आहे. 
फोटो सौजन्य: सोशल मीडिया 
 
28 वर्षाच्या सरवन सिंगने पंजाब येथे सिंचनासाठी बनवलेल्या कालव्यात बुडताना बघितले. हे बघितल्याक्षणी त्याने वेळ न घालवता लगेच आपली पगडी काढली आणि रश्शीप्रमाणे त्याचा वापर करून कुत्र्याचा जीव वाचवला.
 
शीख धर्मात पगडी केवळ स्नान करताना काढली जाते. पण जेव्हा त्याने पगडी काढली आजूबाजूचे लोकं आश्चर्याने बघायला लागले असे सरवन सिंगने सांगितले. लोकांना वाटलं की त्याने धर्माचा अपमान केला पण त्यावेळी सरवनला कुत्र्याचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे वाटले.