testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काळा नवरा नको म्हणून बायकोने नवऱ्याला झोपेत जाळून मारले

Last Modified बुधवार, 17 एप्रिल 2019 (16:52 IST)
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात भयानक घटना उघड झाली आहे. या ठिकाणी बायकोने आपल्या नवऱ्याला झोपेत जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पती काळा असल्याने पत्नीने हे भयानक असे टोकाचे पाऊल उचलले आहे, घटनेनंतर तात्काळ पतीला रुग्णालयात दाखल केले, मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. बरेलीतील खुर्द फतेहगढ पोलीस ठाणेच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितले की, बावीस वर्षीय महिलेने आपल्या नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले आहे. पतीस रुग्णालयात नेले मात्र त्याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामध्ये महिलेचे नाव प्रेमश्री आहे. तिला पोलिसांनी अटक केल्याचंही सिंह यांनी सांगितल. पाहाटेच्या साखर झोपेत सत्यवीर सिंह घरातील खाटावर झोपले होते. याचवेळी पत्नी प्रेमश्रीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना आग लावली. यावेळी पेट्रोलचे काही थेंब प्रेमश्रीच्या पायावरही पडले. ज्यामुळे तिचे पाय देखील भाजले आहेत. सत्यजीत ओरडला होता. हे ऐकून तेथे घरातील इतर लोक आले त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. प्रेमश्रीला सत्यवीर लग्न झाल्या पासूनचा आवडत नव्हता, त्याला ती सातत्याने घालून-पाडून बोलत असे. मात्र
सत्यवीर तिच्यावर खूप प्रेम करत असे. त्यामुळे, आपली पत्नी असे काही करेल, याचा थोडाही अंदाज सत्यवीरल आला नाही. पोलिसांनी पत्नी प्रेमश्रीविरुद्द 302 चा गुन्हा दाखल केला आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

TikTok वर सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर, मद्रास उच्च न्यायालयाने ...

national news
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की ‘TikTok’ अॅपवरील बंदी ...

कामयानी एक्स्प्रेसला आग

national news
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून मुंबईकडे जाणाऱ्या कामयानी एक्स्प्रेसमधून सोमवारी रात्री ...

सतत स्मार्टफोन हातात असतो तर जाणून घ्या यामुळे होणारा आजार

national news
स्मार्टफोनमुळे जग बदलंय. आज कुणीही फ्री बसलेले आढळतं नाही काही सेकंद जरी मिळाले तरी लोकं ...

बायको आणि तीन मुलांची हत्या करून पळाला, नंतर व्हिडिओत ...

national news
इंदिरापुरमच्या ज्ञानखंड येथे एका इंजिनियरने आपल्या पत्नी आणि तीन मुलांची गळा घोटून हत्या ...

शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल अपशब्द ‘आयपीएस असोसिएशन’ने ...

national news
मुंबईत ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत ...