Widgets Magazine
Widgets Magazine

बुधवारपर्यंत संपत्ती जाहीर करा: योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतरही सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलेली नाही. मंत्र्यांनी आपल्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाराज झालेल्या आदित्यनाथांनी मंत्र्यांना पत्र लिहून बुधवारपर्यंत संपत्तीची सर्व माहिती देण्याचा अंतिम इशारा दिला आहे.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर फक्त १३ मंत्र्यांनी आपल्या संपत्तीची विस्तृत माहिती दिलेली आहे. यामुळे नाराज मुख्यमंत्र्यांनी बुधवारपर्यंत सर्व माहिती देण्याचा इशारा देत पत्रात काही सूचनाही केल्या आहेत.
 
राज्यातील मंत्र्यांनी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त मुल्याच्या भेटवस्तू स्वीकारु नये, अशी ताकीद त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर सभासमारंभापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. मंत्र्यांनी शासकीय दौऱ्यावेळी आपल्या घरी किंवा विश्रामगृहात उतरण्यास सांगितले आहे. त्याशिवाय दरवर्षी ३१ मार्चपर्यंत संपत्तीची माहिती देणे बंधनकारक केले आहे.
 
योगी सरकारकडून अधिकार्‍यांच्या बदलीबाबत नवीन धोरण आणले जाऊ शकते. त्याचबरोबर कारभारत पारदर्शकता येण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अटकेनंतर तीन तासांतच विजय माल्याची सुटका

विजय माल्याला भारत सरकारच्या अर्जीच्या आधारावर लंडनमध्ये अटक करण्यात आले आणि त्याला लगेचच ...

news

यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीत पत्रकार ...

news

कोंग्रेसचा नविन पक्ष अध्यक्ष निवड लवकरच ठरणार

कॉंग्रेस पक्षाने पक्षातंर्गत निवडणुकांचा कार्यक्रम पक्षाने जाहिर केला आहे . यामध्ये ...

news

अपघात मायलेकींचा मृत्यू बेजबादार महिला चालक अटक

पुणे येथील कारचा अपघातात जखमी झालेल्या उपचारादरम्यान लेकीनंतर आता आईचाही मृत्यू झाला ...

Widgets Magazine