शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2018 (10:50 IST)

झाकीर नाईक प्रकरणी न्यायिक लवादाने ईडीला फटकारले

वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा प्रमुख झाकीर नाईक प्रकरणी न्यायिक लवादाने याप्रकरणी ईडीला फटकारले आहे. न्या. मनमोहन सिंग यांनी नाईकची सील केलेली संपत्ती ईडीच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. मी अशा १० महाराज-बाबांची नावे सांगू शकतो, ज्यांच्याकडे १० हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे आणि त्यांच्याविरोधात गुन्हेगारीविषयक खटलेही सुरू आहेत. तुम्ही यापैकी एकाच्या विरोधात तरी कारवाई केलीय का, असा सवाल न्या. मनमोहन सिंग यांनी ईडीच्या वकिलांना विचारला.

लवादाच्या अध्यक्षांनी म्हटले की, ईडीने मागील १० वर्षे शारीरिक शोषणाचा आरोप असलेल्या आसारामची संपत्ती जप्त करण्याबाबत काहीच कारवाई केलेली नाही. पण नाईकप्रकरणी ते खूपच जलदगतीने काम करताना दिसत आहेत, असे म्हटले. जेव्हा आरोपपत्रातच अपराध निश्चित करण्यात आलेले नाही. मग संपत्ती जप्त करण्यासाठी काय आधार आहे, असे ईडीच्या वकिलांना विचारण्यात आले.