शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (18:00 IST)

अटलजींनी सोडलेले काम मी पूर्ण करेन ...

रांचीमध्ये 'आयआयटी' स्थापन करणार - नरेंद्र मोदी

घराघरांत पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचवणार - नरेंद्र मोदी
 
राज्यांना उपेक्षित ठेवून देशाचा विकास होत नाही, देशाच्या विकासासाठी सर्व राज्यांचा विकास होणे महत्वाचे आहे - नरेंद्र मोदी.
 
पूर्व, पश्चिम, उत्तर वा दक्षिण कोणतीही राज्ये असोत, भारताचा विकास संतुलित असला पाहिजे - नरेंद्र मोदी.


देशाचा विकास करायचा असेल तर एकही राज्य दुर्बल राहिले नाही पाहिजे - नरेंद्र मोदी.
 
देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनण्याची ताकद झारखंडकडे आहे. गुजरातच्याही पुढे जाण्याची क्षमता या राज्यात आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
विकासाच्या मार्गाची निवड करून आम्हाला निवडून आणल्याबद्दल झारखंडवासीयांचे अभिनंदन. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मन:पूर्वक आभार. तुम्ही जे प्रेम दिलेत, विकासाच्या माध्यमातून ते प्रेम व्याजासकट परत करेन - नरेंद्र मोदी.
 
रांचीतील कार्यक्रमादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बोलत असतानाच नरेंद्र मोदींच्या नावाच्या घोषणा. सोरेन यांच्याविरोधात दिल्या घोषणा.