शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (11:16 IST)

अबू कासिमला कंठस्नान

लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकाने लष्कर-ए-तय्यबाचा वरिष्ठ कमांडर अबू कासिमला कंठस्नान घातले.
 
काश्मीर खोऱ्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांत कासिमचा हात होता.पाकिस्तानच्या बहावलपूरचा रहिवासी कासिम आणि त्याचे सहकारी कुलगामच्या खांदीपुरात दडून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री २ वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली. लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकाने गावाला वेढा घातला. कासिम व त्याच्या साथीदारांनी सुरक्षा दलाच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या वेळी उडालेल्या चकमकीत कासिम ठार झाला. त्याचे इतर सहकारी मात्र लपून बसले असून मोहीम अजूनही सुरू आहे.