गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , सोमवार, 29 जून 2015 (11:14 IST)

अमित शहांकडून ‘हिंदू धर्माचा नारा’

Marathi Samachar, marathinews, Marathi News in webdunia, Latest News In Marathi, 
 
Marathi Batmya, मुख्य बातम्या, ताज्या बातम्या, मराठी वृत्तपत्र, वृत्त जगत, महाराष्ट्र, मराठी वृत्तपत्रे, ठळक बातम्या जगातील सर्व समस्यांवरील उपाय फक्त हिंदू धर्माकडेच आहे असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गुजरात विद्यापीठात माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी शहा बोलत होते.

ते म्हणाले, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणानंतर गुजरातमध्ये प्रवेश बंदी असतानाचा काळ माझ्यासाठी कठीण होता. तेव्हा मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांचे दर्शन घेतले. देवाने आशीर्वाद दिल्याने मी त्या कठीण परिस्थितून बाहेर पडू शकलो, हिंदू धर्मात प्रत्येक समस्येवर उपाय असतो, असे शहा म्हणाले. हिंदू म्हणून जन्मल्याने मी हे विधान करत नाही आहे, असेही त्यांनी नमुद केले.