शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 31 जुलै 2014 (12:05 IST)

अमेरिकेतर्फे नरेंद्र मोदींना क्लीन चिट

2000 मधील गुजरात दंगलींवरुन व्हिसा नाकारणार्‍या अमेरिकेने आता देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या वार्षिक अहवालातून गुजरात दंगलीविषयी मोदींशी संबंधीत दावे हटविण्यात आले आहे. 2007 पासून अमेरिकेच्या या अहवालात गुजरात दंगलींमध्ये मोदींचा उल्लेख आवर्जून केला जात होता. मात्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिका प्रशासनाने मवाळ भूमिका घेतली आहे.  
 
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि वाणिज्य मंत्री पेनी प्रित्जकर हे दोन्ही नेते भारत दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीपूर्वी अमेरिकेने मोदींना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे इंटरनॅशनल रिलीजियस फ्रिडम रिपोर्ट तयार केला जात आहे.