बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

अल्पवयातच मुलींचा विवाह करा

हरियाणातील महिला अत्याचाराच्या घटनांबधये वाढ झाल्याने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली असताना या समस्येचा समाना करण्यासाठी राज्यातील सामाजिक संस्था व काही राजकीय नेते अफलातून सल्ले देवू लागले आहेत. बलात्कारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाप महापंचायतीने मुलींचे अल्पवयात विवाह केले जावेत अशी सूचना राज्य सकरारला केली होती. याच सू‍चनेला राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी पाठिंबा दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौटाला म्हणाले की, मुघलकाळापासून आपण काहीतरी शिकायला हवे. त्याकाळी मुलघलांच्या अत्याचारांपासून मुलींचा बचाव करण्यासाठी त्यांचे लवकर विवाह केले जात. सध्या राज्यात तशीच अवस्था निर्माण झाली असल्याने खाप पंचायतीने हा निर्णय घेतला असावा, त्यांच्या निर्णयाशी मी पूर्ण सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मात्र खाप पंचायतीची ही सूचना फेटाळून लावत कायदे करण्याचा अधिकार केवळ न्यायव्यवस्थेला असल्याचे म्हटले होते.