गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: रांची , गुरूवार, 24 एप्रिल 2014 (10:27 IST)

अल्पवयीन विद्यार्थिनीवर वर्गातच गॅंगरेप

झारखंडमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  लोहारडगा जिल्ह्यातील नागिया गावामध्ये सहावीतील एका विद्यार्थिनीवर आठवीच्या चार विद्यार्थ्यांनी  वर्गात सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पी‍डित विद्यार्थिनीच्या सहाव्या इयत्तेत शिकते. तिच्या शाळेतील  आठव्या इयत्तेत शिकणार्या~ चार विद्यार्थ्यांनी तिला फोन करून फिरायला जाण्याच्या बहाण्याने  बोलावले. चौघे तिला शाळेत घेऊन गेले. एका वर्गात चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.  सध्या चौघे फरार आहेत. पीडित विद्यार्थिनीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर तिला घरच्यांनी  विश्वासात घेवून विचारले असता, तिने झालेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार  दाखल केली आहे. 21 एप्रिलला हा प्रकार घडला. चौघांची ओळख पडली असून पोलिस त्यांचा शोध  घेत आहेत.