गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

असीमानंदच्या आरोपात तथ्य?- सुशीलकुमार शिंदे

WD
नवी दिल्ली- राष्ट्रीय सेवा संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबत स्वामी असीमानंदने केलेल्या आरोपात तथ्य असण्याची शक्यता आहे, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर ठपका ठेवला आहे.

समझौता एक्स्प्रेससह देशातील पाच स्फोटांमागे सरसंघचालक मोहन भागवतांच्या सांगण्यावरून केल्याचा गोप्यस्फोट असीमानंदने एका इंगजी नियतकालीकाला दिलेला मुलाखतीत केला आहे. असीमानंद सध्या अंबाला जेलमध्ये आहे. इंग्रजी नियतकालिक 'द कॅरावान'ने त्याची मुलाखत घेतली.

‘समझोता एक्स्प्रेस’ स्फोट, हैदराबाद मक्का मस्जिद स्फोट, अजमेर दर्गा आणि मालेगावमधील दोन स्फोट असे पाच स्फोट 2006 ते 2008 या दोन वर्षाच्या काळात घडवण्यात आले होते. या सर्व स्फोटांमध्ये सुमारे 119 लोकांचा मृत्यू झाला होता.

या स्फोटांमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचेही बोलले जात होते. स्वामी असीमानंदसह काही जणांना अटकही करण्यात आली आहे.

दुसरीकडे, मोहन भागवत देशद्रोही असून त्यांना अटक करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद यांनी केली. त्याचबरोबर बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी असीमानंदच्या मुलाखतीप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.