शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

आईच्या सेवेसाठी महिलेने सोडली आयएएसची नोकरी

WD
करिअरसाठी आपले घरदार, नातेवाई, आई-वडील सगळ्यांना सोडून जाणा-या अनेक मंडळींची कहाणी आपण ऐकली असेल; परंतु एक गुजराती महिला सरकारी क्षेत्रातले मोठ पद, करिअर या सा-या गोष्टींना बाजूला सारून आपल्या आईच्या सेवेत दाखल झाली आणि सगळ्यांना तिचे कुतुहल वाटू लागले.

गौरी त्रिवेदी असे या ५२ वर्षीय महिलेचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून गुजरातमधून पहिली आयएएस महिला बनण्याचा मान गौरी यांना मिळाला आहे. १९८६ मध्ये कर्नाटकात कामावर रूजू झालेल्या गौरी या २० वर्षे शासकीय सेवेत होत्या. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली ज्यामध्ये महसूल आयुक्तासारखे महत्त्वाचे पदही त्यांच्याकडे होते.

गौरी यांचे कामकाजाचा इतका प्रभाव होता की, त्यांच्या कारकिर्दीत गैरव्यवहाराला त्यांनी थारा दिला नाही. त्याच्या स्वच्छ कामकाजामुळेच त्यांची बदली करण्यात आली तर स्थानिक लोक त्याचा विरोध करायचे. असे असतानादेखील अचानक २००६ मध्ये गौरी यांना घरून निरोप आला की, त्यांच्या आईचा अपघात झाला आहे आणि त्यांच्या कमरेचे हाड मोडल्याने त्यांना सक्तीचा आराम सांगितला आहे. गौरी यांना निरोप मिळताच त्या आपल्या घराकडे रवाना झाल्या. त्यांचे वडील एस. ए. त्रिवेदी ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ असून तेही आधीपासूनच अंथरुणाला खिळून होते. अखेर आपली नोकरी सोडण्याचा निर्णय गौरी यांनी घेतला. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना इतकी वर्षे शासकीय सेवेत असताना अचानक हा निर्णय घ्यायच्या वेळी त्रास झाला असा का, प्रश्न त्यांना अनेक जण विचारतात; मात्र माझ्या आईची सेवा हे एकच कारण मला नोकरी सोडण्यासाठी पुरेसे वाटत होते, असे गौरी यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने त्यांचे योगदान पहाता आई-वडिलांसाठी पूर्णवेळ सेवा देणा-या व्यक्तींची नियुक्ती करण्यात येईल; पण आपण नोकरी सोडण्याचा विचार करू नका, अशी विनंती केली होती; मात्र कोणतीही व्यक्ती माझ्या इतके माझ्या पालकांकडे लक्ष देऊ शकणार नाही, याची खात्री मला होती. म्हणून मी त्यांना नोकरी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. असे असले तरी गौरी गुजरातमध्ये परतल्यानंतर स्वस्थ बसलेल्या नाहीत. त्यांनी गुजरातमध्ये आपल्यासारखेच अनेक विद्यार्थी आयएएस अधिकारी बनावे म्हणून संस्था सुरू केली आहे. येदीयुरप्पा मुख्यमंत्री असताना ते मोदींना भेटले तेव्हा गौरी यांच्या जबरदस्त प्रशासनाची माहिती त्यांनी मोदींच्या कानावर घातली. त्यानंतरच गौरी यांच्या संस्थेचे कामकाज सुरू झाले. माझ्या आईला तीन मुलांच्या पाठीवर झालेली मी मुलगी असले तरी तिने मला कधीच दुय्यम वागणूक दिलेली नाही. मुलगा-मुलगी असा भेदभाव कधीही केलेला नाही. या उलट आयएएस अधिकारी होऊन कर्नाटकला जाण्यामागे तिचेच प्रोत्साहन मला कायम मिळाले, असे गौरी यांनी सांगितले. माझे भाऊ परदेशात राहातात त्यामुळे आईची सारी काळजी मी घेते.