शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (17:15 IST)

आणखी एक जिवंत पाकिस्तानी दहशतवादी पकडला

श्रीनगर- भारतीय सैन्याने आज आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडले. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद या ठिकाणी फौजांशी दहशतवाद्यांची चकमक झाली. यात इतर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.  
 
पोलिस आणि सुरक्षा फौजांना अद्याप पकडलेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही, परंतु हा दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. याच महिन्यात दुसर्‍यांदा हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडण्यात आला आहे. 
 
काहीदिवसांपूर्वीच उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद याला जिवंत पकण्यात आले होते. आणि आता आणखी एक जिवंत दहशतवादी पकडण्यात आलाय.