गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (13:32 IST)

आमच्या शांततेला कमजोरी समजू नका: शरीफ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतीय आर्मीद्वारे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची निंदा केली आहे. यावर शरीफ म्हणाले की आम्ही शांत बसलो आहे याला आमची कमजोरी समजू नये. आम्ही आपल्या देशाची रक्षा करण्यात सक्षम आहोत. पाक मीडियाद्वारे ही माहिती दिली गेली.
शरीफ म्हणाले की मी भारतीय सेनाद्वारे अकारण आणि उघडपणे आक्रमक वृत्तीचा निषेध करतो, ज्यात एलओसीवर पाकिस्तानचे जवान शहीद झाले.
 
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांच्याप्रमाणे, सेना ने सीमा ओलांडून अधिकतर घुसखोरी अयशस्वी केली. त्यांनी म्हटले की बुधवारी रात्री आम्ही एलओसीवर दहशतवाद्यांच्या गटांच्या लॉन्च पॅडवर सर्जिकल ऑपरेशन केले. त्यांनी सांगितले की वारंवार होते असलेली घुसखोरी चिंताजनक आहे.
 
सर्जिकल हल्ल्यात आम्ही दहशतवाद्यांना ठार केले. हल्ल्यापूर्वी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान, जम्मू-काश्मिराचे राज्यपाल आणि सीएम महबूबा मुफ्ती यांना याबाबद माहिती दिली गेली होती.