शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (14:46 IST)

आयआयटी सोबत इतर ८ उपग्रह इस्रो ने सोडले अवकाशात

देशातील अग्रगण्य असेल्या मुंबई येथील आयआयटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘प्रथम’ उपग्रहाचं यशस्वी उड्डाण झालं आहे. देशाच्या  श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 9 वाजून 12 मिनिटांनी ‘प्रथम’ यशस्वीपणे अवकाशात झेपावला आहे.भारताच्या आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोनात  एक महत्वाचा टप्पा  मानला  जानार  आहे.
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या पीएसएलवी-सी35 या प्रक्षेपकातून आज वेगवेगळ्या 8 उपग्रहांसह आय आय टी च्या ‘प्रथम’चं यशस्वी प्रक्षेपण केलं.
 
इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरु केली होती. तर या सोबतच इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी ३५ या प्रक्षेपकाने श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेप घेतली.  ३२० टनचे पीएसएलव्ही सी ३५ हे प्रक्षेपक आठ उपग्रहांसह अवकाशात झेपावले.आठ उपग्रहांमध्ये भारताचे तीन, अमेरिका आणि कॅनडाचे प्रत्येकी एक तर अल्जेरियाच्या आठ उपग्रहाचा समावेश आहे. भारताच्या तीन पैकी स्कॅटसॅट १ हा एक भारतीय उपग्रह असणार आहे. या उपग्रहाचे वजन ३७१ किलोग्रॅम असेल. या उपग्रहांमुळे  सागरी तसेच हवामानसंबंधीच्या अभ्यासात मदत होणार आहे. बेंगळुरुच्या पीएसई महाविद्यालयाच्या एका उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे. अल्जेरियाच्या अल्सेट १ बी, अल्सेट २ बी आणि अल्सेट १ एन या तीन उपग्रहांचाही यात समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांनी इस्रो टीम चे कौतुक केले आहे आणि त्यांनी अभिनंदन केले आहे.