गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (17:36 IST)

इंटरनेटवर लोक शोधत आहे 'मृत्यू'

गूगल आणि इंटरनेटने एकीकडे तर जगाला फार पुढे नेले आहे, पण कुठेतरी हे आभासी माध्यम लोकांना मृत्यूच्या तोंडात ढकलतं आहे.  
नुकतेच असे काही प्रकरण समोर आले आहे ज्यात काही लोकांनी गूगलमध्ये आत्महत्येची ट्रिक शोधली आणि आपला जीव गमावला. कारण गूगल एक असा माध्यम आहे, जो यूजरच्या प्रश्नांचे उत्तर ताबडतोड देतो आणि उलटून प्रश्न देखील विचारत नाही की ही माहिती तुम्हाला कशासाठी हवी आहे.  

बंगळूरच्या ईशाचे गूगलवर ते 48 तास : बंगळूरुमध्ये एका महिलेने एका उंच इमारतीवरून उडीमारून आपला जीव गमावला. ती आपल्या आत्महत्येचा प्रयत्न मागील 48 तासांपासून आखत होती. ईशा हांडा नावाची ही महिला फॅशन डिझायनर होती. तिने 13 मजली बिल्डिंगवरून उडी मारली व आपला जीवन गमावला. 

नंतर शोध करणार्‍या फॉरेंसिक विशेषज्ञांनी मृत्यूच्या जागेवर ईशाचा स्मार्टफोन जप्त केला. जेव्हा त्यांनी फोनला पूर्णपणे तपासले तेव्हा माहीत पडले की मागील 2 दिवसांपासून इशा आपल्या स्मार्टफोनवर आत्महत्या करण्याची पद्धत शोधत होती. या दरम्यान ईशाने 89 वेबसाइट्‍सला विजिट दिली होती.  
 
29 ऑगस्टच्या सकाळी ईशाने मृत्यूचे कारण शोधण्यासाठी गूगल सर्चचा वापर केला होता. या दरम्यान तिने मृत्यूचे प्रकार जसे धावत्या गाडीसमोर उडीमारणे, झोपेच्या गोळ्यांचे ओवरडोज घेणे, गळफास लावणे इत्यादी बघितले.  

चौकशी करताना असे आढळले की ईशाने या दरम्यान यावर देखील रिसर्च केले होते की कुठल्या पद्धतीत वाचण्याचे किती मोके आहे. या सर्व पद्धतींचा गुणाभाग करून ईशाने 13व्या मजल्यावरून उडी मारण्याची योजना आखली.  

13 वर्षाच्या मुलाने सुसाइड नोट टाकले व्हाट्सएपवर : देशाची राजधानी दिल्लीत नुकतेच एका 13वर्षाच्या मुलाने स्वत:ला पंख्यावर लटकवून फाशी लावली.  

या मुलाने आपला सुसाइड नोट व्हाट्सएपवर टाकला ज्यात लिहिले होते की मी या संसारात जगू शकत नाही जेथे नात्यांपेक्षा पैसांना जास्त महत्त्व देण्यात येत आहे. या मुलाचे नाव शानू आहे आणि तो नववी वर्गाचा विद्यार्थी होता. पोलिसाने मोबाइल फोनवरून सुसाइड नोट मिळवला आहे.  

पोलिसांचे म्हणणे आहे की शानू आपल्या आई वडिलांच्या संबंधांमुळे फारच परेशान होता. त्याची आई दुबईत राहते आणि वडील फोटोग्राफर असून दिल्लीत राहतात, ते काही दिवसांपासून आजारी होते.  

इंटरनेट आणि व्हाट्सएपज्या जगात ज्या प्रकारे लोक अडकत आहे तो आता चिंतेचा विषय आहे. आता या गोष्टींवर विचार करणे फारच आवश्यक आहे ज्याने समाज आणि लोकांच्या मृत्यूचे कारण बनत असलेले या सायबर रावणाहून त्यांचा बचाव होऊ शकतो.