मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: गुरूवार, 24 जुलै 2014 (11:09 IST)

इंदूरमध्ये ऑनलाइन विकले जातेय सेक्स पॅकेज!

मध्य प्रदेशची सांस्कृतिक राजधानी इंदूरमध्ये सेक्सचा काळाबाजार जोरात सुरु असल्याचे समतते. अँड्राइड फोनमधील  अॅपपासून शहरातील कॉलगर्ल उपलब्ध करून दिल्या जात आहे. सेक्स माफियांनी इंटरनेटवर इंदूर कॉल गर्ल डॉट को डॉट  इन तसेच इंदूर एस्कॉर्ट सर्व्हिस डॉट को डॉट इन सारख्या वेबसाइट सुरु केल्या आहेत. यामाध्यमातून सौदेबाजी केल जात  आहे.

वेबसाइटवर शहरातील शेकडो कॉलगर्लची माहिती उपलब्ध करून दे्ण्यात आली आहे.कॉलगर्लच्या फोटोखाली मोबाइल क्रमांक  देणयात आला आहे. या क्रमाकांवर ग्राहकाने फोन करताच व्हाट्‍सअपवर अनेक तरुणीचे अनेक फोटो पाठवले जातात.  18 ते 30 वयोगटातील या तरुणी असतात. सौदा फिक्स करण्‍यासाठी माफिया ग्राहकाला एखाद्या हॉटेलमध्ये रुम बुक  करण्यास सांगतात. रुम बुक केल्यानंतर निवडलेल्या तरुणीला पाठवले जाते.

वेबसाइटच्या माध्यमातून बेकायदा सेक्स पॅकेज विक्री केले जात आहे. प्रतितासांनुसार किंमत आकारली जात आहे. 7  ते 35 हजार रुपये पॅकेजचे दर आहेत.