बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (09:12 IST)

इंद्राणी-पीटरने 900 कोटी सिंगापूरमध्ये वळवले

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी यांनी भारतातून 900 कोटी रुपये सिंगापूरच्या बँकेत वळवले होते. त्या बँकेतील खाते शीना बोरा हिच्या नावावर असण्याची शक्यता असून, पैशांचेही कारण शीनाच्या हत्येमागे असावे, अशी शक्यता पुढे येत आहे. या शेकडो कोटी रुपयांच्या व्यवहाराची आणखी माहिती मिळवण्यासाठी पीटरची वाढीव कोठडी मिळावी, अशी मागणी सीबीआयने सेशन्स कोर्टाकडे गुरुवारी केली. कोर्टाने सीबीआयची मागणी मान्य करत पीटरची सीबीआय कोठडी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने पीटरला पुन्हा दिल्लीला नेले.
 
आठवडाभरापूर्वी सीबीआयने अटक केलेल्या पीटर मुखर्जी याचा शीना बोरा हिच्या हत्येमध्ये सहभाग होता, असा आरोप सीबीआयने पीटरवर ठेवला आहे. शीना बेपत्ता झाल्यानंतर पीटरने मुलगा राहुल याला शीना अमेरिकेत असून, आपले तिच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले होते, यावरूनच पीटरला शीनाच्या हत्ये विषयी पुरेपूर माहिती होती, असा दावा सीबीआयने सेशन्स कोर्टात केला होता. दरम्यान, अटकेनंतर सोमवार, 23 नोव्हेंबरला सीबीआयने आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी पीटरला दिल्ली येथे नेले होते. गुरुवारी सकाळी सीबीआयने पीटरला मुंबईत आणून दुपारी सेशन्स कोर्टात हजर केले. यावेळी सीबीआयने पीटर-इंद्राणी यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा हवाला दिला. पीटर-इंद्राणी यांनी आपल्या कंपनीतून 900 कोटी रुपये सिंगापूर येथील बँकेत एका खात्यात जमा केले.