गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इराणींच्या साड्यांचे बिल देण्यास वस्त्रोद्योग मंत्रालयाचा नकार

नवी दिल्ली- केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर पुन्हा एकदा टीकेचा केंद्रबिंदू बनल्या आहेत. एका दौर्‍यात साड्या व गणेश मूर्तीच्या खरेदीचे सुमारे आठ लाख रूपयांचे बिल त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाला देण्यास सांगितल्याने त्यांच्यावर ट्विटरवरून मोठय़ा प्रमाणात टीका केली जात आहे. 
 
इंडिया संवाद वेबसाइटच्या हवाल्याने सोशल मीडियावर इराणी यांच्या या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. यासाठी LooteriMinister हा हॅशटॅग वापरला जात आहे. इराणी यांनी वैयक्तिक कारणांसाठी हे खरेदी केली असल्याने आठ लाखांचे हे बिल वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी ते नाकारले. यावरून इराणी आणि वर्मा यांच्यात कुरबूर झाल्याचे बोलले जात आहे.
 
स्मृती इराणी यांनी साड्या व गणेश मूर्ती खरेदी केले होते. त्यांच्या खासगी कर्मचार्‍यांनी ते बिल सचिव रश्मी वर्मा यांच्याकडे पाठवले. परंतु ही खरेदी वैयक्तिक कारणासाठी असल्यामुळे बिल अदा करता येणार नाही, असे म्हणत वर्मा यांनी ते परत पाठवले. यावरून इराणी आणि वर्मा यांच्यात वाद झाला. वर्मा यांनी कॅबिनेट सचिव यांच्याकडेही यासंबंधी तक्रार केल्याचे म्हटले जाते.