शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: लखनौ , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (16:36 IST)

उत्तर प्रदेशाला धुळीच्या वादळाचे थैमान; 18 जण ठार

लखनौसह परिसरात धुळीच्या वादळाने थैमान घातले आहे. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. लखनौ व बाराबंकीमध्ये तीन, जलौनमध्ये 11, कासगंजमध्ये दोन तर फैझाबाद येथे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. सुमारे ताशी 75 किमी इतक्‍या वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे. शेकडो झोपड्या उडून गेल्या आहेत.

धुळीच्या वादळाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. लोहमार्गावर झाडे उन्मळून पडली आहेत. वीजेचे खांब उखडले आहेत. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या आहेत. मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.