शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2015 (12:41 IST)

उत्तर भारताला भूकंपाचा तीव्र धक्का

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली व संपूर्ण उत्तर भारताला आज (शनिवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपामुळे भारतात कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नसले तरी, नेपाळमध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तराखंड आदी राज्यांत सुमारे 2 मिनिटे भूकंपाचा धक्का जाणविला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 81 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजण्यात आली आहे.
 
भूकंपाचा धक्का जाणवण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी भयभीत होऊन रस्त्यावर पळ काढला. भूकंपामुळे नेपाळमध्ये मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. नेपाळमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.