गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उत्तराखंड: जंगलातील आग नियंत्रणात

डेहराडून- उत्तराखंडमधील जंगलात लागलेल्या भीषण आगीवर एनडीआरएफचे सुमारे 130 जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांना यश मिळत आहे.
 
उत्तराखंडमधील जंगलात गेल्या 3 महिन्यापासून हा वणवा पेटलेला आहे. हा वणवा 5 जिल्ह्यांमध्ये पसरल्यामुळे यात आतापर्यंत 3000 एकर जंगल नष्ट झाले आहे. एनडीआरएफचे संचालक ओ. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील आगीवर आतापर्यंत 70 टक्के नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
 
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, या घटनेला आम्ही गांभीर्याने घेत असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यांनी 6000 कर्मचारी याठिकाणी पाठविण्यात आल्याचे सांगितले. लवकरच पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळविण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले आहेत. 
 
ही आग उत्तरेकडील भागात पसरत चालली आहे. सिमल्याच्या भोवतीच्या जंगलातही वणवा पेटल्याने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात आणि उत्तर परदेशातही आग पसरण्याची शक्यता नाकारात येणार नाही.