शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (10:31 IST)

ए. राजा, कनिमोझींविरुध्द आरोप निश्चित

टू-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात विशेष कोर्टाने माजी दूरसंचारमंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या खासदार कनीमोझी यांच्यासह एकूण 19 जणांविरोधात आरोप निश्चित केलेत. डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या पत्नी दयालू अम्मा यांचाही यात समावेश आहे. सर्व 19 जाणांवर हवालाचा ठपका कोर्टाने ठेवला आहे.
 
अंमलबजावणी संचालनालयाने टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी एकूण 19 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यात 10 व्यक्ती आणि 9 कंपन्यांचा समावेश आहे. सर्वाविरोधात 200 कोटींच्या हेराफेरीचा आरोप आहे. डीबी ग्रुप कंपनीला स्पेक्ट्रमचा परवाना देण्याच्या बदल्यात ए. राजा यांनी हा पैसा भ्रष्ट मार्गाने मिळवला, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.