गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जम्मू , मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (11:24 IST)

एक जवान जिवंत

हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या जवानांपैकी एक जवान जिवंत अवस्थेत सापडला.
सहा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर लान्स नायक हनमंतअप्पा कोप्पड जीवंत सापडला.

आतापर्यंत चार जणांचे शव बाहेर काढण्यात आले असून, चौघांची ओळख पटली आहे. हे चारही जवान मृतावस्थेत सापडले. पाकिस्तानच्या सीमारेषेवर सरासरीपेक्षा ४५ अंशाखाली तापमानात १९ हजार ६०० फूट उंचीवर असलेली चौकी हिमस्सखलनामुळे उद्ध्वस्त होताच एका ऑफिसरसह १० जवान जिवंत गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.