बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (15:28 IST)

एकमेकांचे व्याही बनणार लालू आणि मुलायम!

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादव आता एकमेकांचे व्याही बनणार आहे. मुलायम यांचा नातू तेजप्रताप सिंह आणि लालूंची मुलगी राजलक्ष्मी यांचा विवाह लवकरच होणार आहे. 
 
तेजप्रताप सिंह यादव मैनपुरी लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. राजलक्ष्मी ही लालू यादवांची धाकटी मुलगी आहे. तेजप्रताप सिंह आणि राजलक्ष्मीचा साखरपुडा डिसेंबर महिन्यात होणार असून फेब्रुवारीमध्ये शाहीविवाह होणार आहे.
 
तेजप्रताप यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आहे. तसेच लालू आणि मुलायम हे दोघे मित्र आहेत. आता या मैत्रीचे रुपांतर नात्यात होणार आहे.  लालू आणि मुलायम या दोनांनी स्वत:च्या बळावर बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये सत्ता कायम राखली आहे. उत्तर प्रदेशात आता समाजवादी पक्षाचे सरकार आहे.