मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 जुलै 2015 (23:24 IST)

एपीजे अब्दुल कलाम यांचे व्हिजन 2020 पूर्ण होणार

व्हिजन 2020मुळे देशाचे भाग्य बदलण्याची गोष्ट करताना माजी राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की भारताला आपल्या ग्रामीण क्षेत्रांकडे विशेष लक्ष्य देण्याची गरज आहे. कारण गाव आणि शहर जोपर्यंत प्रगतीच्या मार्गावर एकसमान विकास करणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. आणि 2020पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.   
 
माजी राष्ट्रपती कलाम आयआयटी कानपुरच्या स्टूडेंट जिमखान्याच्या गोल्डन जुबली समारंभात  भाग घेण्यासाठी आले होते. या वेळेस त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून आपल्या ज्ञानाचा  उपयोग देशसेवा आणि विकासासाठी लावण्याची प्रतिज्ञा घेतली.  
 
कलाम यांनी म्हटले की देशाची सर्वात जास्त जनसंख्या ग्रामीण भागात असल्यामुळे जोपर्यंत आम्ही गाव आणि शहरांच्या विकासात समानता आणत नाही, तोपर्यंत देशाचा संपूर्ण विकास कसा होईल? म्हणून गावांचा विकास लवकरात लवकर करणे आवश्यक असून त्यांच्या विकास कार्यक्रमास चालना आणणे आवश्यक आहे आणि यावर सध्या चांगले कार्य होत आहे.  
 
त्यांनी पुढे असेही म्हटले की आयआयटीचे विद्यार्थी फारच हुशार मानले जातात आणि ते ज्या कोणत्याही क्षेत्रात जातात तेथे आपले नाव कमवतात, मग ती नोकरी, उद्योग असो किंवा व्यापार. म्हणून आयआयटीच्या विद्यर्थ्यांना आपल्या सोबतच त्या समाजासाठीपण काही करावे ज्या समाजाने त्यांनी एवढे काही दिले आहे.