मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 18 जून 2016 (11:44 IST)

ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादांचं उल्लंघन : कृष्णप्रकाश

ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादांचं सर्रास उल्लंघन झाल्याचा दावा पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी केला आहे. शिवाय लॉटरी किती अंकी असावी याचंही बंध पाळलं नसल्याचा आरोप कृष्णप्रकाश यांनी केला आहे. 
 
बुलडाण्यामध्ये कार्यरत असताना कृष्णप्रकाश यांनीच सर्वात आधी या लॉटरी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. लॉटरीद्वारे कसा पैसा उकळला गेला, याचा तपशीलही कृष्णप्रकाश यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून दिला आहे. लॉटरी घोटाळा जनतेसमोर आल्याचं समाधान व्यक्त करणारी एक पोस्ट कृष्णप्रकाश यांनी फेसबुकवर टाकली आहे.