गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (14:39 IST)

ओरिसा: माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त

कोरापूत- लष्कराने आपल्या कारवाईत जिल्ह्यातील जंगलामध्ये माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. ही माहिती देत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक छरनसिंग मिना यांनी सांगितले की, जोझियागुडा जंगलामध्ये माओवाद्यांच्या तळाबाबत माहिती मिळाल्यानंतर स्वयंसेवी दल व विशेष कृती दलाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. 
 
माओवाद्यांचा तळ उडवून देताना माओवादी व जवानांमध्ये चकमक झाली. त्यात काही जवान जखमी झाले आहेत ज्यांना उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
या घटनेत काही माओवादीही गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.