शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 26 जुलै 2014 (10:52 IST)

'काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणे अवघड'

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नसल्याचे दिसत आहे. अ‍ॅटर्नी जनरलनी कायद्याचा आधार घेत संसदेच्या सदस्यसंख्येच्या किमान 10 टक्के सदस्य असलेल्या पक्षालाच विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते, असे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. 
 
काँग्रेसला लोकसभेत‍ 44 जागा मिळाल्या असून किमान 54 जागा मिळवलेल्या पक्षालाच ही जागा मिळू शकते. विशेष म्हणजे कुठल्याच विरोधी पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. रोहतगी यांनी यापूर्वीही जवाहरलाल नेहरू व राजीव गांधी यांच्या सत्ताकाळात 11 टक्क्यांपेक्षा कमी जागा मिळालेल्या असल्याने विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.