शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कामचुकार बाबूंना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही

नवी दिल्ली- सरकारी नोकरी म्हणजे मौजमजा करण्याचे ठिकाण अशी समजूत झालेल्या सरकारी बाबूंवर आता हडबडून जागे होण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की, ज्या कर्मचार्‍यांचे काम चांगले नसेल त्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही.
 
कर्मचार्‍यांना आता खासगी कंपन्यांप्रमाणे कार्यक्षमतेवर आधारित वेतनवाढ देण्याचे सूतोवाच सरकारने केले आहे. सातव्या वेतन आयोगासाठी अधिसूचना लागू करत असताना अर्थमंत्रालाने प्रसिध्द केलेल आदेशात म्हटले आहे की, बढती आणि वेतनवाढ मिळणसाठी कर्मचार्‍यांची कामगिरी पूर्वीप्रमाणे गुड ऐवजी व्हेरी गुड असणे आवश्क आहे. आता व्हेरी गुड श्रेणीमध्ये असलेल्या कर्मचार्‍यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे.