शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2016 (11:34 IST)

काळवीट शिकारप्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता

जोधपूर- बहुचर्चित काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला दिलासा मिळाला आहे. राजस्थान उच्च न्यायलयाने 1998 सालीच्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केली. सलमानसह अन्य सात जणांविरूद्ध चिंकाराची शिकार केल्यामुळे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 
खंडपीठाने तब्बल 18 वर्षांनंतर आपला निकाल दिला आहे. 1998 मध्ये सिनेमा 'हम साथ-साथ हैं'च्या शूटिंगदरम्यान सलमान याने जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी सेशन कोर्टाने सलमानला दोन प्रकरणात दोषी ठरवले होते. भवाद काळवीट शिकारप्रकरणी 1 वर्षाची, तर घोडाफार्म काळवीट शिकारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 
 
सलमानने या निर्णयाला आव्हान दिले होते. या दोन्ही प्रकरणांत सलमानची निर्दोष मुक्तता केली आहे. सलमानसह अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलमवर काळवीटची शिकार केल्याचा आरोप होता.