शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , सोमवार, 27 जून 2016 (10:13 IST)

काळा पैसा 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करा : मोदी

ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करावं, अन्यथा त्यानंतर मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काळा पैसा ठेवणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

पंतप्रधान मोदी आज ‘मन की बात’मध्ये बोलताना म्हणाले, “ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांना भारत सरकारने एक संधी दिली आहे की, आपली अघोषित संपत्ती 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करावी. अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी विशेष सुविधाही सरकारने सादर केली आहे. ठराविक दंड भरुन काळ्या पैशाच्या संकटातून मुक्त होऊ शकता.”

“जे लोक आपल्याकडील काळा पैसा स्वत:हून जाहीर करतील, त्यांना कोणत्याही चौकशीला सामोरं जावं लागणार नाही, हे माझं वचन आहे. एवढी संपत्ती कुठून आली, कशी आली, याबाबत विचारलंही जाणार नाही. त्यामुळे हीच मोठी संधी असून, पारदर्शक कारभाराचा भाग बना.”, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे