शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:46 IST)

काळ्या पैशाबाबत 7 ऑक्टोबरपूर्वी अहवाल द्या

काळ्या पैशाच्या मुद्दय़ाबाबत विशेष तपास पथकाने केलेल्या शिफारशींबाबत केंद्र सरकारने 7 ऑक्टोबरपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
 
विशेष तपास पथकाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी अहवालाची केलेली मागणी न्यायालयाने  फेटाळून लावली आहे. न्यायालयाने याप्रकरणी 28 ऑक्टोबर ही शेवटच्या सुनावणीची तारीख असल्याचे जाहीर केले आहे. स्वीत्झर्लडनेही भारताला आवश्यक ती माहिती पुरविण्यास अनुमती दर्शविली आहे.