शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 2 मार्च 2015 (12:38 IST)

काळ्या पैसेवाल्यांना शेवटची संधी

विदेशी बँकांमध्ये काळापैसा असलेल्या भारतीय नागरिकांना त्यांची मालमत्ता जाहीर करण्याची शेवटची संधी केंद्र सरकारने दिली आहे. त्यानंतर मात्र त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे, असे वित्त राज्यंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
 
त्यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली, ते पुढे म्हणाले, काळ्या पैशाची माहिती दडविणार्‍यांना 10 वर्षांपर्यंत  तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल अशी घोषणा काल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडताना केली आहे. विदेशातील काळ्या पैशाची माहिती दडविणार्‍यांना सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे; तर काळ्या पैशाची माहिती लपविणे आणि करचुकवेगिरीसाठी 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.