बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीर: 51 दिवसांनंतर संचारबंदी शिथिल

श्रीनगर- गेल्या 51 दिवसांपासून काश्मीर खोर्‍यात लागू असलेली संचारबंदी आज उठविण्यात आली आहे. श्रीनगर आणि पुलवामा येथील काही क्षेत्रात लोकांच्या एकत्र होण्यावर बंदी राहील. मात्र, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यासह श्रीनगरमधील एम. आर. गुंज आणि नोहट्टा पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत अद्याप संचारबंदी कायम आहे.
 
पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोर्‍याततील संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
अनंतनाग जिल्ह्यात गेल्या आठ जुलैला हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहाण वणी याला ठार मारल्यानंतर संचारबंदी लागू झाली होती ज्यामुळे गेल्या 51 दिवसांपासून येथील लोकांचे जीवन प्रभावित झाले होते.
 
वणीला ठार मारल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.