शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीरमध्ये 4 दहशतवादी ठार

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तीन घटना लष्कराच्या जवानांनी उधळून लावल्या. दरम्यान, यावेळी केलेल्या कारवाईत 4 दहशतवादी ठार झाले. तसेच पूंछमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. तर तीन पोलीस जखमी झाले आहेत.
 
पूंछ जिल्ह्यात अल्लाह पीर भागात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. दहशतवादी पूंछमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मिनी सचिवालयात घुसले आहेत. अजूनही तिथे चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तिथे किमान 3 दहशतवादी लपले आहेत. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीला मारलनंतर एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असतानाच कश्मीर खोर्‍यातून 80 तरुण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले तरुण दहशतवादी संघटनेत दाखल झाले असतील, असे खळबळजनक वृत्त समोर आले आहे.
 
कुख्यात दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर मोठय़ा संखेने तरुण काश्मीरमधील तरुण खासकरुन दक्षिण कश्मीर मधून बेपत्ता होत आहेत. एका वृत्तानुसार कश्मीरच्या चार जिल्ह्यातून (पुलवामा, कुलगाम, अनंतगान आणि शोपिंया) मागील दोन महिन्यात 80 तरुण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या तरुणांचे प्रमाण अधिकतर पुलवामा जिल्यातील आहे.